सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे मांगवडगांव फाटा येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रास्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग नोंदवला होता.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलन,उपोषण मोर्चे काढण्यात येत आहेत.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील असे सांगण्यात आले. आंदोलना दरम्यान अनेकांनी आपापली मते मांडली.
यावेळी सरपंच शिरीषकुमार इंगळे, उपसरपंच विकास थोरात, बाळू गायकवाड, शशिकांत थोरात प्रदेश सदस्य भाजपा अनु जाती मोर्चा, ग्रा. प. सदस्य राजाभाऊ तोडकर, संदीपान इंगळे, विष्णु थोरात, उमेशइंगळे, प्रल्हाद थोरात, दगडु इंगळे, महादेव चादर, आकाश फरके, प्रकाश देशपांडे, जनक साखरे, बाळासाहेब काटे, धनगर समजाचे नेते दत्ता करडे, तानाजी फरके, आसेफ पठाण, हरून पठाण, बाबुराव इंगळे, बाबूवान इंगळे, सत्तार शेख, सुमंत इंगळे, हनुमंत चादर, राम निर्मळ, राजाभाऊ करडे, आबासाहेब जाधव, प्रकाश फरके, लिंबराज ठोंबरे, आदिनाथ इंगळे, रामधन गायकवाड, हनुमंत कापरे, हरी इंगळे, महादेव गायकवाड, बिपीनइंगळे, विनोद तोडकर, गोकुळइंगळे, सदाशिव इंगळे, दादा सुकाळे, विलास थोरात यांच्यासह गावातील परिसरातील नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युसुफवडगाव पोलिस स्टेशन ठाण्याच्या वतीने विशेष फौज फाटा तैनात करण्यात आला होता.