मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठा आरक्षण मेळाव्याचे आयोजन

केज :- दत्तात्रय मुजमुले
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठा आरक्षण मेळाव्याचे, चिंचोली माळी मध्ये आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की,मागील काही दिवसांपूर्वी सराटी अंतरवालीमधील जनतेवर झालेल्या अमानुष लाठीचार निषेधार्थ राज्यभर पडसाद उमटले व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलने उभी राहिली परंतु आता त्यांनी उपोषण माघे घेतले व सरकारला एक महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे त्यामुळे याकाळात देखील राज्यभरात आंदोलनाची धग कमी झाली नाही पाहिजे मराठा आरक्षणाची जनजागृती ही झाली पाहिजे याच कारणास्तव चिंचोली माळी ता. केज याठिकाणी मराठा आरक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मोठ्या संख्येने केज तालुक्यातील मराठा बांधवांनी उपस्थित रहाण्याचे चिंचोली ग्रामस्थांनी आवाहन केले आहे दि. १७ सप्टेंबर २०२३ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी चिंचोली माळी ता. केज याठिकाणी सायंकाळी ६ वाजता संत नामदेव महाराज मंदिरा समोर मराठा आरक्षण मेळावा होईल.
आरक्षण मेळाव्याचा उद्देश म्हणजे आजपर्यंत सर्व पक्ष , सरकार प्रस्थापित नेते यांनी मराठा आरक्षणासाठी केलेली फसवेगिरी मराठा आरक्षण लढा व कायदेशीर अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेत सरकारचा वेळकाढूपणा, संविधानिक पद्धतीने मराठा आरक्षण मिळविण्याचे मार्ग, सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेतील लाभ मिळण्यासाठी ची प्रक्रिया व येणाऱ्या अडचणी मराठ्यांना ओबिसी मधूनच आरक्षण किंव्हा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे हीच मागणी गृहीत धरून यापुढील लढा व याबद्दल जनजागृती तरी आपण सर्वजण एक दिवस समाजासाठी, समाजातील प्रत्येकासाठी या म्हणीप्रमाणे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चिंचोली माळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे .