Uncategorized
आत थंडीला ब्रेक लागणार !

अंबाजोगाई :- प्रतिनिधी
पुढील 48 तासात जोरदार पाऊसाचा अंदाज हवामान विभागाचा हाय अलर्ट असल्याने राज्यात थंडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून हवामानाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ही बातमी आहे.गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढ होता, थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. मात्र आत थंडीला ब्रेक लागणार असून, पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन ते 03 दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर 03 डिसेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे.