जिजामाता रुग्णालयात डॉक्टर बनून फिरत होता चहावाला

पिंपरी चिंचवड (दि30 जुन)
महापालिका रुग्णालयात चहा विक्रीसाठी येणारा तरूण डॉक्टरांचे स्टेथाॅस्कोप गळ्यात घालून रुग्णांना आपण डॉक्टर असल्यास भासवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून महापालिकेच्या रुग्णालयात बाहेरील खाजगी व्यक्तींना खाद्यपदार्थ विक्रीस बंद केली आहे हा प्रकार पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात नुकताच घडला.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिला असून त्यात म्हटला आहे की जिजामाता रुग्णालयात बाहेरील खाद्यपदार्थ विक्रीला येणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आला होता मात्र एका ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने रुग्णालयात एक विक्रेत्याला परवानगी देण्यात आली होती त्याला अडवायचे नसल्याबाबत सुरक्षकांना सांगण्यात आलं होतं. या विक्रेता तरुणाची रुग्णालयात मनमानी सुरू होती अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये हा तरुण तासून तास बसून असायचा शिशुच्या आय सी यु मध्ये थेट जात होता डॉक्टरांचे स्टेथाॅस्कोप गळ्यात घालून तो डॉक्टर असल्याचे भासवत होता. त्याची हे फोटो समाज माध्यमांवर वायरल झाले हे अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी
नढे यांनी महापालिका आयुक्तांना भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला त्यानंतर आयुक्तांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांना याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या याप्रकरणी डॉक्टर गोफणे यांनी महापालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना लेखी पत्र देत महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बाहेरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बंदी घालण्याच्या सूचना दिल्या या घटनेच्या अनुषंगाने दोन सुरक्षारक्षकांवर कारवाई केल्याची माहिती समजली आहे. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही