राजकीय
केज नगर पंचायतीत जनविकास आघाडीचे वर्चस्व*

कॉंग्रेसला मोठा धक्का ; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येचा पराभव
केज – नुकत्याच झालेल्या केज नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. जाहीर झालेल्या निकालानुसार केजकरांनी जनविकास आघाडीला कौल दिला आहे. जनविकास आघाडीने १७ पैकी ८ जागांवर विजय प्राप्त केला. राष्ट्रवादीला ५ तर कॉंगेसला केवळ ३ जागांवर विजय मिळाला असून एक जागेवर स्वाभिमानी पक्षाने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या हर्षदा यांना पराभवाचा धक्का बसला. हारून इनामदार यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या जनविकास आघाडीने मात्र दणदणीत यश मिळविले आहे. तर, प्रभाग ५ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अवघ्या दोन मतांनी विजय मिळाला.
*