Uncategorizedसामाजिक

उंदरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

उंदरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

केज प्रतिनिधी:- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील उंदरी येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,स्पूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ९ वा. कुलवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले व प्रतिमापूजन करून जिजाऊ वंदना घेऊन जयंती करण्यात आली.

19 फेब्रुवारी 1870 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.जाती धर्माच्या बेड्या झुगारून सर्व धर्म समभाव याची शिकवण देणारे राजे,स्त्रियांचा आदर करणारे राजे,शुर पराक्रमी राजे म्हणून शिवाजी महाराजांची ओळख आहे.अशा रयतेचे राजे यांची जयंती साजरी करण्यात येते आहे.उंदरी येथील तरुण युवक मंडळ आणि छावा मराठा संघटनेच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली.जयंतीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे अश्व.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आश्वाने गुडघे,डोके टेकत अभिवादन करण्यात केले. या वेळी सरपंच संतोष ठोंबरे, छावा जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे, उध्दव ठोंबरे,व्हाईस चेअरमन भिमराव ठोंबरे, महेश ठोंबरे ,दिनेश ठोंबरे, मुन्ना ठोंबरे, चंद्रकांत ठोंबरे, समाधान ठोंबरे, वाघ्या ठोंबरे, विश्वास ठोंबरे, विष्णू ठोंबरे, किशोर ठोंबरे, गणेश ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, अशोक ठोंबरे, महेश पतंगे, त्र्यंबक ठोंबरे ,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत ठोंबरे, सोमनाथ गरडे, केशव ठोंबरे व इतर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!