Uncategorized

केज मध्ये नवयुवक प्रतिष्ठानची विविध उपक्रमाने शिवजन्मोत्सव साजरा*

*केज मध्ये नवयुवक प्रतिष्ठानची विविध उपक्रमाने शिवजन्मोत्सव साजरा*

*सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची उपस्थिती*

केज: शहरात वकिलवाडी भागात नवयुवक प्रतिष्ठान च्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या मंडळाच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री यशवंत गोसावी यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, विजय आरकडे, अशोक सोनवणे यांची उपस्थिती होती. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजनही करण्यात आले होते.19 फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिर वकिलवाडी प्रांगणात सुंदर सुशोभीकरण केलेल्या मंचावर शिवरायांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. सायंकाळी साडेसात वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून समारोप करण्यात आला. या शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश (बबलू) साखरे,विजय वनवे, मनोज शिंदे, गणेश लांडगे, संजय काळदाते, योगेश गरुड, विजय तांडेल, मनीष मस्के. शशिकांत गायसमुद्रे, बाळासाहेब मुंडे, मेजर रोहिदास खामकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्याने परिश्रम घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!