सामाजिक

केज येथे छत्रपती संभाजी राजे यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण कृती समितीचे आंदोलन सुरू

केज येथे छत्रपती संभाजी राजे यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण कृती समितीचे आंदोलन सुरू

केज:दत्तात्रय मुजमुले प्रतिनीधी

मराठा समाजाला आरक्षण तात्काळ द्यावे व आरक्षण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शासनाने आपल्या अधिकारात असलेल्या शासकीय सवलती व सुविधा मराठा समाजाला तात्काळ मंजूर कराव्यात या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर श्री छत्रपती संभाजी राजे यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी केज तालुका मराठा समन्वय समिती व तालुका मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने 26 फेब्रुवारी सकाळी 11 वाजेपासून मुंबईचे आंदोलन सुरू असेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सध्या हे आंदोलन सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार असून गरज पडल्यास आंदोलनाची वेळ व प्रकार बदलला जाणार असून आंदोलन आवश्यकतेनुसार हे आंदोलन तीव्र करण्यासाठीची रणनीती ठरविण्यात आल्याचे समन्वयक हनुमंत भोसले यांनी कळविले आहे.
मराठा आरक्षनासाठीची संविधानात्मक प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो. या मध्यंतरीच्या काळात समाजातील गरजू लोक व विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अधिकारातून शैक्षणिक सवलती व सुविधा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य, सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरीव मदत या व इतर बाबी शासनाने तात्काळ मंजूर कराव्यात या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास केज शहर व तालुक्यातील बहुजन-मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी केज तहसील कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आजच्या आंदोलनात हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, अरविंद थोरात, रविकुमार गायकवाड, संजय नखाते, चिंचोली माळी चे सरपंच देशमुख, शिवाजीराव ठोंबरे, कैलास चाळक, कुलदीप करपे, भागवतराव सोनवणे, हनुमंत गव्हाणे, पत्रकार श्रावनकुमार जाधव, गौतम बचुटे, आदेश देशमुख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

चौकट

या आंदोलनात रविवारी चिंचोली (माळी) सर्कल मधील वरपगाव, केवड, साळेगाव, पिंपरी, बोरगाव, भोपला, कापरेवाडी, लाखा, सातेफळ, हादगाव, डोका, सारुकवाडी व टाकळी या गावच्या समाज बांधवांचा सहभाग राहणार असल्याचे हनुमंत भोसले यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!