Uncategorized
राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य योजने अंतर्गत जन जागृती प्रचार प्रसिद्धी करिता “कृषि विभागाचा रोड शो”

राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य योजने अंतर्गत जन जागृती प्रचार प्रसिद्धी करिता “कृषि विभागाचा रोड शो”
केज- दत्तात्रय मुजमुले प्रतिनीधी
कृषि विभाग राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य योजने अंतर्गत जन जागृती प्रचार प्रसिद्धी करिता तालुका कृषि अधिकारी केज यांच्या वतीने केज शहरात मोटार सायकल रॅलीचे (रोड शो ) आयोजन करण्यात आले होते. या रोड शो चे उदघाटन श्री रमेश उत्तमराव सिरसट उदयानपंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली सुरु करण्यात आली. कृषि कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी रोड, बस स्टॅन्ड,धारूर रोड,धारूर चौक या मार्गांवर रॅली काढण्यात आली.
यावेळी तालुका कृषि अधिकारी केज श्री चंद्रकांत देशमाने, श्री विकास अंभोरे मंडळ कृषि अधिकारी मस्साजोग, श्री उमेश आघाव हेड कॉनस्टेबल केज,श्री मस्के, श्री.आंधळे गृहरक्षक दल केज,श्री योगेश लामतुरे अध्यक्ष कृषि सहाय्यक संघटना केज तसेच कृषि विभाग सर्व अधिकारी कर्मचारीसह शेतकरी वर्ग श्री विजय जाधव,श्री सधूभाऊ घोळवे, शरद ठोंबरे,श्री मसूराम राऊत इतर शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते