होळ जिल्हा परिषद गटातून भाटुंबा येथील माजी सरपंच राम जोगदंड यांच्या नावाची जनतेतून मागणी

केज :- दत्तात्रय मुजमुले
बीड जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे.केज तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आपापल्या सोयीचे गण आणि गट निवडायला सुरवात केली आहे.प्रतेक जण आपापल्या परीने बांधणी करायला लागलेले आहेत.
केज तालुक्यातील होळ हा एकमेव जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती साठी राखीव आहे.या राखीव मतदार संघातून भाटुंबा येथील माजी सरपंच आणि रमेशराव आडसकर यांचे खंदे समर्थक राम जोगदंड यांच्या नावाची जनतेतून मागणी होत आहेत.जोगदंड म्हणजे जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून त्याची चर्चा होत आहे.जोगदंड यांनी मागील काळात BSNL लॅंडलाइन फोनचे कंत्राटी लाईनमन म्हणून होळ जिल्हा परिषद गटात असणाऱ्या गावांमध्ये काम केले असल्याने गावा गावात आणि घरोघरी त्यांचा जवळचा संबंध प्रस्थापित झालेला आहे.HDFC बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत असताना अनेक सेवा त्यांनी लोकांना दिल्या आहेत.नंतरच्या काळात भाटुंबा येथील सरपंच असताना त्यांनी गावातील सार्वजनिक प्रश्न,विविध विकासकामे करून गावाचा सर्वांगीण विकास त्यांनी त्याच्या कार्यकाळात केला होता त्यामुळे प्रशासनातील कामाचा त्यांचा अनुभव चांगला आहे.दुष्काळी परिस्थिती मध्ये संपुर्ण गावातील जनतेला चुलबंद मोफत भोजन ,रक्तदान ,गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागा मार्फत घरपोच मोफत खत, बी,औषधी पुरवठा करने,सततचा जनसंर्पक व समाजकार्याचा वसा घेतलेला सर्वांशी मैत्रिने राजकारणा पलिकडे जाऊन नाते सबंध मित्रप्रेम जपणारा हक्काचा कार्यकर्ता,,म्हणुन पंचक्रोषित तालुक्यात जवळपास सर्वांच्या परिचयाचा ते आहेत त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात ते सरपंच संघटनेचे सचिव म्हणून काम केले असल्याने सर्व सरपंचाशी सलोख्याचे संबंध आहेत.
मागील कडाक्याच्या उन्हाळ्यात त्यांनी केज अंबाजोगाई महामार्गावर भाटुंबा फाट्यावर निःशुल्क आणि स्वखर्चाने प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोई उभारली होती अशा जनतेसाठी राबणाऱ्या,लोकांची कामे करणाऱ्या राम जोगदंड यांच्या उमेदवारीच्या मागणीचा जोर होळ गटातील नागरिकांनी धरला असल्याचे बोलले जात आहे.