राजकीय

युसुफ वडगाव जिल्हा परिषद गटातून दिलीप भिसे यांनी लढवावी:- वाव्हळकर

केज :- दत्तात्रय मुजमुले

बीड जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे.केज तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आपापल्या सोयीचे गण आणि गट निवडायला सुरवात केले आहे.प्रतेक जण आपापल्या परीने बांधणी करायला लागलेले आहेत.

केज तालुक्यातील युसुफ वडगाव गट खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेकांनी यासाठी बांधणी सुरू केली आहे.या गटातून मुंडे घराण्याचे समर्थक आणि पंकजा मुंडे यांचे विश्वासू जेष्ठ नेते दिलीप भिसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने झेडपीची निवडणूक लढवावी अशी मागणी सौंदना येथील शिवाजी किसनराव वाव्हळकर यांनी केली आहे.त्यांची आजवर ची कारकीर्द पाहता ते 1978 ते 1990 पर्यंत बिनविरोध सरपंच राहिलेले आहेत.शेतकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देखील काम केले आहे. केज तालुका खरेदी विक्री संघाचे ते पदाधिकारी होते तसेच अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून काम पाहिले आहे.तसेच नॅचरल शुगर कारखान्यात आणि एन साई मल्टीस्टेट ते संचालक आहेत.

तालुक्यासह युसुफ वडगाव जिल्हा परिषद गटातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे त्यांनी युसुफ वडगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी गटातील नागरिकांची इच्छा आहे त्यामुळे त्यांनी जनेतेच्या इच्छेखातर बिजेपी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची अशी मागणी शिवाजी किसनराव वाव्हळकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!