Uncategorized

भाटुंबा येथील जनजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई ची सोय

भाटुंबा येथील जनजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई ची सोय

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राम जोगदंड यांचा स्तुत्य उपक्रम

केज:- दत्तात्रय मुजमुले प्रतिनीधी

तालुक्यातील भाटुंबा येथील जनजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फिल्टर्ड आर.ओ पिण्याच्या पाण्याची सोय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम धर्मराज जाेगदंड यांनी नागरिकांसाठी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन केज-आंबाजाेगाई महामार्गावरील भाटुंबा फाटा येथे थंड शुद्ध केलेले फिल्टर्ड आर ओ चे (जारचे) पिण्याच्या पाण्याची पाणपाेई ची सोय येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात आली.या पाणपोई चे उद्घाटन जनविकास संस्थेचे सचिव रमेशरावजी भिसे व झुंजार नेता वृतपत्राराचे जेष्ठ पत्रकार श्रावनकुमार जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पाणपाेई जनसेवेत सुरू झाली असे जाहीर करण्यात आली असे यावेळी जाहीर करण्यात आली.या उद्घाटन प्रसंगी कृ बा ऊ स केजचे संचालक अरून बप्पा धपाटे ,जनविकास संस्थेचे मचिंद्र बप्पा लांडगे, उपसरपंच सुनिल कापरे,राजेभाऊ तपसे (मुकदम),भिमराव आबा तपसे,प्रा गणेश चाळक ,तंटा मुक्ती समितीचे मुकेश भाऊ चवरे, समाजसेवक महादेव जाेगदंड,अमर भैय्या कापरे,अभिजीत चवरे, शाहुराव धपाटे,शाहुराव अप्पा धपाटे,हनुमंत चवरे, बालु (गुरूजी) तपसे,हनुमंत जाेगदंड, श्रीनिवास जाेगदंड,अनिल कापरे,मान्यवर ऊपस्थित हाेते.
या ऊद्घाटन प्रसंगी जनजागृती सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री राम धर्मराज जोगदंड यांनी ही पाणपोई स्वखर्चाने चालु केलेल्या माेफत पाणपाेईचा गावातील ,पंचक्रोशितील व महामार्गावरील प्रवास्यानी लाभ घ्यावा असेही आवाहन संस्थेचे अध्यक्ष राम धर्मराज जाेगदंड यांनी अवहान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!