
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्याची सकल मातंग समाज बांधवांची मागणी
केज :- दत्तात्रय मुजमुले
रोहित कसबेंच्या नेतृत्वाखाली एकवटला मातंग समाज
साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात राज्यभरात १ ऑगस्ट रोजी साजरी होत असते त्याचाच भाग म्हणून केज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे डिजिटल सुशोभीकरण हे जयंतीच्या अगोदर करण्यात यावे अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली.
दि.१५ जुलै रोजी केज शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सकल मातंग समाज बांधव एकत्र येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या यांच्या जयंतीनिमित्त केज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई इनामदार यांना सर्व मातंग समाज बांधवांच्या वतीने निवेदन दिले.
या वेळी रमेश पाटोळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाज बांधवांना सांगितले व पुढे बोलताना रमेश पाटोळे म्हणाले की, मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी व समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. यावेळी रोहित कसबे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवावर व व समाजातील एकीकरण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी दत्ता लांडगे, एल.एस.जाधव, रमेश पाटोळे, रोहित कसबे, विजय लांडगे,मुन्ना लोंढे, योगेश भाई गायकवाड, अनिल गालफाडे,सचिन क्षिरसागर, दिलीप गालफाडे,विक्रांत गालफाडे, कुणाल पवार, गणेश चांदणे, संदीप गालफाडे,सचिन लोखंडे, कुणाल पोळ,फुलचंद खाडे,बालासाहेब खाडे, तानाजी दुनघव,बाबुराव गालफाडे,गोविंद लांडगे, विक्रांत लांडगे,नंदकुमार पाटोळे,प्रवीण लांडगे, शरद कांबळे,दीपक पाटोळे आणी सर्व समाज बांधव उपस्थित होते.