केज मधील नाले सफाई करणाऱ्या मजुरांचे , कामगारांचे आरोग्य धोक्यात

केज :- केज नगरपंचायत सध्या नगरपंचायत करिता असणारे सर्व कायदे नियम मोडून काम करत असतानाचे चित्र दिसत आहे. केज शहरात एकुण सतरा वार्ड आहेत .केज शहराची लोकसंख्या तीस हजाराच्या जवळपास आहे . वस्ती मोठ्याप्रमाणात असल्यामुळे प्रत्येक नगरामध्ये नाल्यांची साफसफाई करावी लागते . मात्र जे नाल्या साफ करणारे मजुर , कामगार आहेत त्यांच्या हक्कापासुन त्यांना वंचित ठेवले जात आहे.शासनाच्या नियमानुसार प्रत्येक नाले साफ करणाऱ्या मजुरांना ,सफाई कामगाराांना आवश्यक साहित्य म्हणजेचे सुरक्षा उपकरणे ,ऑक्सीजन मुखवटे देणे बंधनकारक आहेत हे साहित्य न देता गटारांची साफसफाई करण्याकरीता उतरविल्यास जबाबदार अधिकारी ,कंत्राटदाराविरुद्ध , एफआयआर दाखल करण्याचा नियम असताना मात्र केज नगरपंचायतचे प्रशासन बेजवाबदारपणाने सर्रास मजुराच्या , कामगारांच्या आरोग्याशी, जीवनाशी, कुंटुंबाशी खेळत आहेत त्यांच्या कडुन सेफ्टी किट न देता केज शहरातील नाले सफाई करण्याची कामे करून घेतली जात आहेत .
पाठीमागील कांहि दिवसापूर्वी केजच्या बस स्टॅन्ड बाजुस असणाऱ्या गटाराची सफाई करताना मजुराला सेफ्टी किट दिली गेली नाही त्याबरोबर आज रोजी कानडी रोड हनुमान मंदीरासमोरील गटारे साफ करणार्या मजुरांना, कामगाराना देखील सेफ्टी किट न देता त्यांच्याकडुन स्वच्छतेची कामे करून घेतले जात आहे .या मजुरांना आश्या अवस्थेत पाहुन नगरपंचायत प्रशासन नगरपंचायत अधिनियम ,कायदा विसरुन मजुरांच्या आरोग्याशी , जीवनाशी , कुटुंबांशी खेळत आहेत कि काय अशीच चर्चा नागरीकामध्ये होत आहे.