युसुफ वडगाव पंचायत समितीसाठी प्रवीण खोडसे प्रबळ दावेदार

केज:- दत्तात्रय मुजमुले
बीड जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे.केज तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आपापल्या सोयीचे गण आणि गट निवडायला सुरवात केले आहे.प्रतेक जण आपापल्या परीने बांधणी करायला लागलेले आहेत.
केज तालुक्यातील युसुफ वडगाव पंचायत समिती ही खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेकांनी यासाठी बांधणी सुरू केली आहे.मात्र सध्या चर्चा ही ग्रीन बेल्ट मधील नायगाव येथील प्रवीण खोडसे यांच्या नावाची.सामाजिक,राजकीय क्षेत्रात त्यांची ओळख आहे.सर्व सामन्यासाठी काम करण्याची त्यांची पद्धत आहे.तरुणांच वलय असणारा आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुणांनापैकी ते एक आहेत.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्यामुळे पक्षाला मानणारा वर्ग देखील मोठा आहे.आजवर संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव रस्त्यावर उतरत त्यांनी काम केले आहे.सामाजिक,राजकीय क्षेत्राचा दहा ते बारा वर्षाचा अनुभव काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यास त्यांच्या कामी येणार असल्याचे बोलले जात आहेत.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याउपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात.
युसुफ वडगाव पंचायत समिती प्रवीण खोडसे यांनी लढल्यास या गणासाठी ते प्रभावी आणि प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहेत.