किशोर वाघमारे यांनी होळ जिल्हा परिषद निवडणूक लढवावी :- दत्ता शिंदे

किशोर वाघमारे यांनी होळ जिल्हा परिषद निवडणूक लढवावी :- दत्ता शिंदे
केज :- दत्तात्रय मुजमुले
बीड जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे.केज तालुक्यातील होळ नव्याने झालेला गट आहे.हा तालुक्यातील राखीव गट सुटला आहे.त्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
केज येथील सामाजिक कार्यकर्ते सदैव गोरगरीब लोकांसाठी मदतीला धावणारे, अन्नदान शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक समाजोपयोगी कार्य करणारे विद्यार्थी लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष किशोर वाघमारे यांनी होळ जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी होळ येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे यांनी केली आहे.वाघमारे यांची केज तालुक्यातील आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून ओळख आहे.विद्यार्थी लोक जनशक्ती पार्टीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत.छात्र लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय केबिनेट मिनिस्टर पशुपति कुमार पारस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. किशोर वाघमारे यांचा चांगला जनसंपर्क असल्याने त्यांनी होळ जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी होळ येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे यांनी केली आहे.