जिल्ह्यात सर्व मंडळात सोयाबीनीला विमा द्या-भाई मोहन गुंड

केज :- दत्तात्रय मुजमुले
महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यातील ८७ मंडळात २५% अग्रीम विमा देण्याचे निर्देश दिले आहेत.सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात पेरा असून सोयाबीन हे पीक नेमक जाणीवपूर्वक वगळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची नुकसान होणार आहे.मुग(२२)मंडळात,उडीद (१३) मंडळात तर सोयाबीन फक्त (५२) मंडळात असा विमा लागु केला आहे.केज तालुक्यात सोयाबीन जवळपास ८१ हजार ९.९४ हेक्टर पेरा झाला आहे तर मूग ८०० हेक्टर,उडीद ६०० हेक्टर बीड जिल्हा देखील सर्वात मोठा पेरा शेतकऱ्यांनी सोयाबीनचा केलेला आहे.
सोयाबीन आज पावसाअभावी वाळून जात आहे.केजसह जिल्ह्यातील सर्व मंडळात सोयाबीनचा पिकाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे,जिल्हा कृषी अधिकारी बीड,कृषी अधिकारी केज अन्यथा शासन विमा कंपनीच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने (दि.३) सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता केज अंबाजोगाई रोडवरील चंदनसावरगाव बस स्टॅन्ड वर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची महिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी निवेदन पत्राद्वारे केज तहसीलदार यांना दिली.
यावेळी शत्रुघ्न तपसे,भाई अशोक रोडे,भाई दिंगाबर मगर,मंगेश देशमुख,महेश गायकवाड,अजित पौळ,बाबाराजे गायकवाड,शाम चिंचोलीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.