दिलेला शब्द पूर्ण करण्याची भाजपामध्ये ताकद- नगरसेवक कुंदन गायकवाड

(महावीर जाधव)पिंपरी चिंचवड:-प्रभाग क्रमांक १ मध्ये १८ मीटर रुंद डी.पी रोड,शिवशंकर कॉलनी क्रमांक १ रस्ता काँक्रेटिकरण,गणेशनगर कॉलनी क्रमांक १ रस्ता काँक्रेटिकरण व अन्य विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज संपन्न झाला.
आपल्या नागरिकांना चांगल्या सुविधा व दैनंदिन जीवनमान सुखी असावे हा माझा मानस असून त्या दृष्टीने भरीव निधी उपलब्ध करून देत आहे.या विकासकामांमुळे नोकरदार,व्यवसायिक,विद्यार्थी अबाल वृद्ध आणि माझ्या माता भगिनी यांचा रोजचा प्रवास सुखाचा असेल याचे मला समाधान आहे असे भूमिपूजन प्रसंगी आमदार महेशदादा लांडगे म्हणाले.
या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना फ.प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २०१७ साली सत्ता आल्या पासून आमदार श्री.महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने कोट्यावधी रुपयांचा भरीव निधी शहर विकासासाठी उपलब्ध झाला.जो शब्द निवडणूक काळात दिला तो पूर्णत्वास नेत विकासाचा डोंगर शहरात उभा राहिला आहे.रस्ते ही कुठल्याही शहराची उद्धाराची नस असतात हे जाणून आमदार साहेब व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी मोठ्या मेहनतीने कार्य करत आहेत.
निवडणुकीत दिलेले शब्द हे पूर्ण करून आरक्षणासह रस्ते व मूलभूत भौतिक विकास घडवण्यासाठी मेहनत घेणारे भाजपाचे सर्व नगरसेवक असून आमदार महेशदादा लांडगे यांच्यामुळे आपल्या भागात विकासाची गंगा वाहत आहे व विकासाचा झंजावात पुढेही असाच सुरू राहील.
प्रभाग अंतर्गत रस्ते असो की मुख्य जोडरस्ते यांचा झपाट्याने होत असणारा कायापालट हे कार्यसाम्राट आमदार महेशदादा लांडगे यांची कामाची पद्धत आहे.शहरातील सर्व नागरिकांना एक कृतिशील लोकप्रतिनिधी आपण दिलेला आहे याचे समाधान नागरिक बोलून दाखवत आहे.बघतो करतो असे न करता प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करून तो सोडवण्यासाठी लढणारा आमदार म्हणून महेशदादा लांडगे यांची ख्याती सर्वत्र आहे असेही श्री.कुंदन गायकवाड म्हणाले.
शहाराच्या महापौर सौ.उषा (माई) ढोरे,स्थायी समिती सभापती श्री.नितीन लांडगे,माजी महापौर राहुलदादा जाधव,पक्षनेते श्री.नामदेव ढाके,फ.प्रभाग अध्यक्ष नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड,नगरसेविका सौ.साधना मळेकर,सौ. स्विनल मेहत्रे,माजी नगरसेवक सुरेशतात्या मेहत्रे,माजी नगरसेवक गीताराम मोरे,माजी सभापती सुभाष मोरे,भाजपा उपाध्यक्ष किसन बावकर,माजी नगरसेवक सुनील लोखंडे,अमृतआप्पा सोनवणे,स्वीकृत नगरसेवक संतोष मोरे,संदीप शेलार,जितू यादव,आबा मोरे,सदानंद महाराज बग,पांडाभाऊ साने,चिखली ग्रामस्थ,सर्व सोसायटीचे चेअरमन आदी.उपस्थित होते.