Uncategorized

परीट धोबी समाजाच्या वतीने माजी सैनिक श्री गजानन पिंपळे यांचा सत्कार

संभाजीनगर प्रतिनिधी

श्री गजानन सर्व्हिसेस सेक्युरिटी एजन्सीचे संचालक तथा माजी सैनिक समाज गौरव पुरस्कार प्राप्त श्री.गजानन पिंपळे व त्यांच्या अर्धांगिनी सौ. कीर्ती पिंपळे यांचा परीट धोबी समाजाचा वतीने श्री.गणेश भाऊ मढीकर (राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवा मराठवाडा अध्यक्ष) यांच्या हस्ते श्री गजानन सर्विसेस च्या मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला.
मागील महिन्यात परीट धोबी समाजाचे कार्यकर्ते तथा श्री गजानन सर्व्हिसेस चे कर्मचारी श्री.फकीरबा सखाराम शिरसाट यांचे घर शॉर्टसर्किटमुळे पूर्णपणे जळाले होते. त्यामुळे त्यांचा संसार हा उघड्यावर आला होता.अशा अत्यंत बिकट परिस्थितीत श्री गजानन पिंपळे यांनी त्यांच्या व त्यांच्या कंपनीच्या सर्व सहकार्याच्या वतीने फकीरबा शिरसाठ यांना तीस हजारांची भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या संसाराला हातभार लावला होता. त्यांच्या या कार्याची दखल धोबी परीट समाजाच्या वतीने घेण्यात येऊन गजानन पिंपळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री गजानन सर्विसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रफुल तिळवे यांनी पण मोलाचे सहकार्य केले यानिमित्त त्यांचा सुद्धा यावेळी परीट धोबी समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परीट धोबी समाजाचे श्री.डॉ.प्रशांत नेतनकर, श्री रामचंद्र सोनवणे, श्री. गणेश मढीकर , श्री.कल्याण मढीकर, श्री शंकर जाधव, श्री फकीरबा शिरसाट, सौ.लक्ष्मीबाई शिरसाट, श्री विनोद शिंदे, श्री. राजेश भाले, श्री.मनोज पाटील, श्री. माधव कराळे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!