Uncategorized

महापरिनिर्वाण दिनी अंबाजोगाईत सामूहिक महा बुध्द वंदनेचे आयोजन

अंबाजोगाई: प्रतिनिधी

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंबाजोगाई शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समस्त अंबाजोगाईरांच्या वतीने व पु. भिक्खु प्रज्ञाबोधी थेरो बारामती यांच्या मार्गदर्शन खाली सामुहिक महा बुध्द वंदना व अभिवादन कार्यक्रम दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी बुधवार सकाळी ठीक ०७ :३० वाजता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अंबाजोगाई या ठिकाणी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन महाबुध्द वंदना व अभिवादन कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन सामूहिक महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समिती, बुध्दिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया अंबाजोगाई च्यावतीने करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रत्येकाने सोबत येताना गरजूवंत विध्यार्थ्या करीता जास्तीत जास्त प्रमाणात पेन – वही सोबत घेऊन यावे. सर्व समाज बांधवांनी आपआपल्या परिसरात, नगरात, चौकात, बुध्द विहारात, सभागृहात महाबुध्द वंदने नंतर अभिवादन कार्यक्रम सकाळी ९.०० नंतर आयोजित करावेत.महाबुध्द वंदना कार्यक्रम संपल्यानंतर पानगाव चैत्य स्मारकास जाणाऱ्यांनी हा अभिवादन कार्यक्रम करून नंतर जावे. महाबुध्द वंदना यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले कुंटुंब आपली जबाबदारी याप्रमाणे कुंटुंबासहीत उपस्थित रहावे. घरी कुणीही थांबू नये. कर्मचारी वर्गाने बुधवार जरी असला तरी देखील सकाळी लवकर कार्यक्रम संपन्न करून आपल्या कर्तव्यावर जावे.

सर्वांनी या सामाजिक कार्यक्रमाचे स्वतः हून प्रचारक व्हावे. विशेषतः तरुण युवा वर्गाने पुढे येऊन facebook, Reel, whats app status, text msg, स्वतः चे तयार करावेत. शहरात केवळ बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे इच्छुकांनी आपले फोटो न टाकता केवळ नाव टाकुन बॅनर्स लावावेत, दुचाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग (parking) व्यवस्था ही बुध्द पार्क बोधीघाट ग्राऊंडवर करावी. सर्वांनी पांढरा पोशाख परिधान करून, घरी कुणीही न थांबता घरातील सर्वच मंडळींनी वेळ काढून महा बुध्द वंदनेस उपस्थित राहुन महामानवास एकतेने, निष्ठेने, विनम्रपणे अभिवादन करावे असे विनंती पूर्वक आवाहन महाबुद्ध वंदना 7:30ते 8.30वा अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीच्या वतीने आवहान करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!