Uncategorized

शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी

शिवसेना केज विधानसभा प्रमुख परशुराम जाधव यांचे आवाहन.

केज :- दत्तात्रय मुजमुले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार केज विधानसभा संपर्क प्रमुख परशुराम जाधव हे केज तालुका दौ-यावर आले असता दिनांक 20 ऑक्टोबर रोजी शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यासह परशुराम जाधव यांनी केज तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची शेतात जाऊन पाहणी केली असता प्रचंड नुकसान झाल्यानें शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी तनावात वैफल्यग्रस्त झाला आहे म्हणून शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी असे आवाहन त्यांनी केले व जर भरीव व तात्काळ मदत शेतकरी बांधवांना मिळाली नाही तर शिवसैनिक प्रशासन व शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी युवा सेना केज तालुका प्रमुख अरविंद थोरात विधानसभा प्रमुख अशोक जाधव शहर प्रमुख तात्या रोडे उपतालुकाप्रमुख अभिजीत घाटुळ सह शिवसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!