राजकीय

उमेदवारी गृहीत धरून शेतकरी पुत्र बजरंग सोनवणेंच्या युसुफवडगाव गटात भेटीगाठी

ठिकठिकाणी सोनवणेंचे स्वागत, सवांद साधून चर्चा

केज :- बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी गृहीत शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी भेटीगाठी भर दिला आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी येडेश्वरी कारखान्यावरील पवनसुत हनुमान मंदिरात दर्शन घेत युसुफवडगाव गटातील गावच्या मंदिरात दर्शन घेतले. गावकऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांचा युसुफवडगाव येथे आगमन होताच सरपंच महेश गायके, माजी सरपंच रुपेश बोरगावकर, सचिन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात जाऊन सोनवणे यांनी दर्शन घेतले. गावकऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांनी संवाद साधला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य उमाकांत भुसारी, चेअरमन अरुण चोपणे, माजी चेअरमन श्रीहरी चोपणे, खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब निशिगंध, केज बाजार समितीचे संचालक अरुण राऊत, व्हाईस चेअरमन महादेव मोडवे, उपसरपंच महेश लामतुरे, चंद्रकांत सातपुते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 गोटेगाव येथील माजी सरपंच तथा संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष बालासाहेब बोराडे यांच्या निवासस्थानी बजरंग सोनवणे यांनी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. सोनेसांगवी येथे विखे पाटील साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आप्पासाहेब ईखे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. त्याचबरोबर सरपंच मुकुंद कणसे यांच्या निवासस्थानी ही भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच विजयकुमार ईखे, बालासाहेब नाईकवाडे, माजी सरपंच मनोहर इटकर, शाहूराव ठोंबरे, उपसरपंच राहुल डिकले, महेश गायके, बब्रुवान कणसे, लक्ष्मण खोडसे, माणिक गुळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!