मावळ मतदार संघात सर्व पक्षीय नेत्यांची खासदार बारणेंविरुध्द नाराजी,महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा विजयाचा मार्ग सुकर

पिंपरी:- मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच धोस्पोस चालू होती हा मतदारसंघ भाजपाकडे घेऊन माजी आमदार बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी प्रकर्षाने होत आहे तर यावेळी उमेदवार असावा म्हणून अजित पवार गट सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होता या ओढाताणीत पुन्हा शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आग उसळले त्यामुळे पिंपरी चिंचवड सह मावळ मधील भाजपा कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रसंगी आम्ही भरण्याची काम करू शकत नाही असा पवित्र घेतल्याने बारणेंना उमेदवारी मिळूनही भाजपच्या ताठर भूमिकेमुळे बारण्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे
मावळ लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच शिवसेनेकडे आहे त्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने संजोग वाघेरे यांची उमेदवारी 15 दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली तर संजू वगैरे यांचा घाटाच्या खालील तिन्ही तालुक्यांमध्ये पहिला राऊंड पूर्ण झाला आहे त्यामुळे वाघेरे यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत असून महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबांची नावावर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची अधिकृत उमेदवार म्हणून नुकतीच घोषणा करण्यात आली दोन्हीही उमेदवार पिंपरी चिंचवड मधील रहिवासी असल्याने त्यांच्या घरी चुरस पाहायला मिळणार असल्याचे मतदारांमध्ये बोलले जाते संजू वगैरे यांनी स्थानिक समस्यांसह शेतकरी कामगार महिला रोजगार व बेरोजगारी या विषयांवर ती प्रचारात भर दिल्याने त्यांना तरुणांचाही प्रचंड पाठिंबा मिळत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत व कडवट शिवसैनिक हे संजोग वाघेऱ्यांच्या विजयासाठी सज्ज झाले आहेत संजू वगैरे यांना औद्योगिक पट्ट्यातील स्थानिक उद्योजक व कामगार यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे मावळ मतदार संघात विद्यमान आमदार सुनील शेळके आणि विद्यमान खासदार श्री रंग भरणे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या जुगलबंदी सुरू आहे त्यापाठोपाठ माजी मंत्री बाळा भेगडे ही बारण्यांचे विरोधात दंड थोपटत आहेत प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करतेवेळी बाळणें विरोधातील प्रचंड असणारी मंडळी खऱ्या अर्थाने उघड होईल लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून मावळ मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळे आजही त्यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे पिंपरी चिंचवड मधील मतदारांमध्ये सुद्धा बारणे विषयी नाराजीचा सुर दिसून येत आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांचा विजय निश्चित होणार असल्याचे मानले जाते.
हा मतदारसंघ पारंपारिक ओरिजनल शिवसेनेचाच असल्याने येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, आम आदमी पार्टी, शेकाप हे सर्व पक्ष महाविकास आघाडीतच असल्यामुळे आमचा विजय निश्चितच होणार असून घाटाच्या खालील तालुक्यात शेकापची ताकद चांगली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्व तालुक्यातून आमचाच फायदा निश्चित होणार असून विजयाची माळ मावळ मतदार संघातील मतदार हा आमच्याच गळ्यात घालणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
संजोग वाघेरे
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार
