Uncategorized

चाईल्ड प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

केज :- प्रतिनिधी

केज येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेल्या चाईल्ड प्रायमरी स्कूलच्या बालकलाकारांनी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये उत्कृष्ट विविध कला नृत्य करत उपस्थित असलेल्या सर्व पालकांची मने जिंकली. बहारदार अशा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाने उपस्थित पालकांच्या नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ. जालिंदर जाधव, तर उद्घाटक म्हणून एमपीएससी मार्फत निवड झालेले जिल्हा शिक्षण अधिकारी विशाल मुळे, व केज केंद्राचे केंद्रप्रमुख संजयजी चौरे हे होते.

यावेळी स्वराज्य पुरस्कार वितरण सोहळा ही करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार हनुमंत सौदागर, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रा. डॉ नागेश कराळे यांना तर कृषी क्षेत्रातील पुरस्कार हरिश्चंद्र पांचाळ, युवा उद्योजक पुरस्कार महेश तपसे व बाल संरक्षण पुरस्कार संतोष रेपे यांना देण्यात आला. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना आपले आई-वडीलच देव याची जाणीव होण्यासाठी मातृ पितृ पूजन हा कार्यक्रम घेण्यात आला. चिमुकल्याने आपल्या आई-वडिलांना ओवाळून त्यांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले, या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारची नृत्य साजरी केली यामध्ये गणरायांना वंदन करणाऱ्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली नंतर शेतकरी गीत, गणपती गीत, सामाजिक संदेश देणारे काही गीत, देशभक्तीपर गीत, भारुड, मराठी गाणी, लावण्या, कोळीगीत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित काही गाणी अशा वेगवेगळ्या गाण्याने कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी पालकांची व उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजय चाटे, तुकाराम माळकर, गोविंदजी देशमुख, पत्रकार दत्तात्रय मुजमुले, बळीराम पारेकर,ज्येष्ठ पत्रकार विनोद शिंदे, एचपी देशमुख, पत्रकार रामदास तपसे, रब्बानी शेख, शिवाजी दादा ठोंबरे, पत्रकार रणजीत घाडगे, पत्रकार सनी शेख, शीघ्र कवी प्रकाशजी काळे, भाऊसाहेब शिंदे, भीमराव गिराम, गणेश तपसे, मीनाक्षी माळकर, हे उपस्थित होते, यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद गिराम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले जिल्हा शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी अभ्यासाशिवाय पर्याय नाही, व आपल्या पाल्याला चांगल्या पद्धतीचे कसे शिक्षण देता येईल याकडे लक्ष देण्यासाठी आव्हान केले व शाळेस शुभेच्छा दिल्या नंतर संजयजी चौरे यांनी पालकांना मार्गदर्शन केले,तर हनुमंत सौदागर यांनी पालकांनी उदासीनता झटकून विद्यार्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, शाळेशी समन्वय साधने गरजेचे आहे, चाईल्ड प्रायमरी स्कूल ही शाळा केज शहरात चांगल्या पद्धतीचे ज्ञानदान करण्याचे काम करत आहे, अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप जालिंदर जाधव यांनी केले तर आभार नागेश कराळे यांनी मानले. या वेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!