Uncategorized

अनावश्यक खर्च टाळत अजित धपाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

केज :- दत्तात्रय मुजमुले

सध्या सर्वत्र धूम धडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेज निर्माण झाली आहे. लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत मोठे मोठे खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. अतिरिक्त सजावट, फुगे फोडणे, फटाके वाजवणे ,मेणबत्ती जाळणे ,असे खर्च करून वाढदिवस साजरे करण्याची सध्या चढाओढ निर्माण झाली आहे मात्र सामाजिक आत्मभान ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे.क्वचितच ही प्रथा आता सध्या पाहायला मिळत आहे.मात्र युवा उद्योजक अजित धपाटे यांचा 29 व वाढदिवस एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढदिवसावर होणारे अवाढव्य खर्च टाळत वाढदिवसानिमित्ताने शालेय साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. अजित धपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी माणुसकीचा आधार फाउंडेशन च्या टीमने वसुंधरा प्रा. मा.आश्रम शाळा केज येथे 12 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य केळी बिस्किट खाऊ वाटप करण्यात आला, त्यानंतर खाऊ वाटप कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना वाटप करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील खाऊ वाटप झाल्यानंतर केज मधील चिंचोली पाटी जवळ असलेले युवा ग्राम संचलित अक्षय बालकाश्रम येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी युवा ग्रामचे संचालक श्री. एच.पी. देशमुख यांनी त्यांच्या मार्फत होणारे सर्व सामाजिक कार्यक्रम सर्व रीतसर माहिती सांगितली .व इतरही चर्चा त्यांच्यासोबत करण्यात आली या बालकांबरोबर वाढदिवस साजरा करताना बालकांना वाटप करण्यात आलेला खाऊ आणि शालेय साहित्य पाहून बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खरंच असा वाढदिवस करण्याचे आज सार्थक झाले असल्याचे अजित धपाटे यांनी बोलताना सांगितले.आपणही आपला वाढदिवस अशा ठिकाणी साजरा करून आपल्या आनंदात सहभागी करून घेवू शकता.

यावेळी माणुसकीचा आधार फाउंडेशनचे श्री.निलेश तोडकर डॉ.विवेक डोईफोडे,योगेश वैरागे, प्रताप वैरागे ,श्री.विकास गवळी सर, महावीर पटेकर, डॉ.निखिल भालेराव, अजितदादा धपाटे, अमर धपाटे, परमेश्वर बोबडे, कृष्णा सूर्यवंशी, राहुल पटेकर आदींनी दिवसभरातील कार्यक्रम पूर्ण करण्यास सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!