राजकीय

विविध मागण्यासाठी केज तहसीलदार यांना निवेदन

केज :- दत्तात्रय मुजमुले

केज विधानसभा मतदार संघातील विवीध मागण्यासाठी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी तहसीलदार केज यांना निवेदन दिले आहे. एपीएल कार्ड धारकांना रेशनचे वाटप करण्यात यावे आणी संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वाटप करण्यात यावे. या मागणीसाठी माजी आमदार पृथ्वीराज साठेयांच्या सह शिष्ट मंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी तहासिलदार केज यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केज तालुक्यात पावसामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एपीएल कार्डधारकांना मागील महिन्या पासून रास्त किंमतीतील स्वस्त धान्य बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांची होणारी उपासमार थांबवावी.तसेच केज तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून अनेक लाभर्थ्यांनी आपल्या अर्ज दाखल केले आहेत.परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या योजनेत पात्र लाभार्थी हे दिव्यांग,विधवा महिला, वयोवृध्द नागरीकांचा समावेश आहे.अनेक लाभार्थ्यांचे जीवन हे या मानधनावर अवलंबुन आहे.परंतु त्यांना वेळेवर मानधन वाटप होत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत असुन त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे.यावर तात्काळ कारवाई न झाल्यास तहसील कार्यालया समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी पृथ्वीराज साठे यांच्या सह महिला आघाडीच्या सौ.संजीवनी किरण देशमुख,तसलिम इनामदार,जिल्हाउपाध्यक्ष सारंग आंधळे,नगरसेवक अझरोद्दीन इनामदार, नारायण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!