मोबाईलच्या वापरामुळे आपले ध्येय चुकू नका विद्यार्थ्यांना आव्हान.

आई वडिलांचा त्याग विसरू नका तेव्हाच भविष्य घडेल- सपोनी शंकर वाघमोडे
केज :- दत्तात्रय मुजमुले
केज पोलीस स्टेशनचे ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांनी नांदुर घाट येथील जीवन प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सध्याच्या कॅम्पुटर युगामध्ये मोबाईलचा असलेला जास्त वापर त्यामधून उद्भवणाऱ्या समस्या या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणाकडे न जाता चुकीच्या मार्गाने जात असल्याचे तसेच वेळेचा चुकीचा वापर होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आई-वडिलांचा त्याग गुरूंची शिक्षणाची शिदोरी योग्यपणे लक्षात घेऊन आपल्या भविष्याचे कायाकल्प करून घ्यावे जेणेकरून त्या कुटुंबाचा समाजाचा सर्व दृष्टीने विकास होऊ शकतो. शिक्षणामुळे आपण योग्य ध्येय गाठू शकता असे बोलताना ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मुलींना जर कोणी छेड काढत असेल त्रास देत असेल त्याची गाठ माझ्याशी आहे. कुणालाही त्रास झाला तर तात्काळ पोलिसांना कळवा आपल्या शिक्षणाकडे लक्ष देऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे.तालुक्यांमध्ये होणाऱ्या विविध घटना लक्षात घेता अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी मार्गदर्शनपर प्रत्येक शाळेमध्ये भेट देऊन होणारा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य श्री.ढाकणे, जमादार श्री.भालेराव,पोलीस नाईक रशीद शेख शिक्षकवृंद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.