मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे व इतर दोघांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी

उपजिल्हाधिकारी यांना आंबेडकर समुदायाच्या कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज गरबडे व इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याच्यावर कलम ३०७,३५३ सारखे गुन्हे दाखल केले.मनोज गरबडे व इतर दोघांची बिनशर्त सुटका करुन महापुरुषांच्या बाबतीत सतत अवमानकारक, तुच्छतेने बोलणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा असाच प्रकार चालु राहिला तर जनता आणखी जोरदार प्रतिकार करेल अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
आंबेडकर समुदायाच्या कार्यकर्ते बब्रुवान पोटभरे गुरुजी, राजेश वाहुळे,दयानंद कांबळे,अमोल हातागळे,अक्षय शिंदे,राजाराम कुसळे,अशोक सोनवणे,भागवत जाधव,सय्यद आसिफ,अक्षय भुंबे, जगन्नाथ पाटोळे,प्रतिक तरकसे,संजय शिंदे,रवि सोनवणे,विशाल सोनटक्के,आकाश घनघाव, मोहम्मद ताहेर,रघुनाथ आरखडे,सुरज वाघमारे,कांबळे अक्षय,कपिल हिरवे,प्रशिक सिरसट,सुरेश सरवदे,अशोक ढवारे,राहुल ओव्हळ,रमेश गुट्टे,प्रशांत घनघाव,शरिफखान नुरखान, विशाल पोटभरे, विनोद सिरसाट,दिपक ढवारे,दिपक गवळे,विकास मस्के,उषा आदमाने इत्यादीच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदनातून म्हटले आहे
चौकट:- ३०७ सारखा गंभीर गुन्हा शाईफेक करणाऱ्यावर लावला आहे.धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर हा गुन्हा दाखल केला जातो :- बब्रुवान पोटभरे गुरुजी