माजी नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन ‘समाजरत्न पुरस्कार २०२२’ने सन्मानित

ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने त्रिभुवन यांच्या कार्याचा गौरव
( पिंपरी चिंचवड)आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ ‘राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते.
याअंतर्गत सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांना ‘समाजरत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाधिकारी श्री. इ .झेड. खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ होत्या कार्यक्रमाचे उदघाटन यशदा संशोधन अधिकारी बबन जोगदंड तर स्वागत अध्यक्ष ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे हे होते. कार्यक्रमाचे संयोजक आमचे मित्र श्री राहुल भातकुले हे होते कार्यक्रमाचे आकर्षण जीवनगौरव पुरस्कार चे मानकरी तथा प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध जस्ट सिने कलाकार अनंत जोग हे होते आंतरराष्ट्रीय उद्योजक माननीय श्री भगवान गवई दुबई यु ए इ लिज्जत पापड उद्योग समूहाचे चेअरमन श्री सुरेश कोते साहेब स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नरेंद्र माने उपस्थित होते
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीडसारख्या जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी आलेले बाबासाहेब त्रिभुवन यांनी समाजाप्रती असलेल्या आपल्या तळमळीतून सामाजिक कार्यात सहभागी होत समाजातील वंचित, गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी कायम संघर्ष केला. त्यांच्या याच धडपड्या वृत्तीची दखल घेत चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी त्रिभुवन यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना २०१७च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर रहाटणी प्रभागातून सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची संधी व पाठबळ दिले. या संधीचे सोने करत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्रिभुवन यांनी आपला संपूर्ण कार्यकाळ हा सातत्याने जनसेवेसाठी वाहिला. सर्वसामान्यांसाठी हक्काचा व २४ तास उपलब्ध असणारा नगरसेवक अशी ओळख बाबासाहेब त्रिभुवन यांची झाली.
त्यांच्या याच जनकार्याची दखल ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनने घेत त्यांना ‘समाजरत्न पुरस्कार २०२२’ या पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला असून हा पुरस्कार आपल्याला पुढील कार्यासाठी प्रेरित करेल अशी भावना, बाबासाहेब त्रिभुवन यांनी व्यक्त केली आहे.