पक्षाच्या उमेदवास आर्थिक मदत देऊन ताकत देण्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच वेळ

केज :- प्रतिनिधी
विधानसभा,लोकसभा किंवा इतर कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी आगोदर तो उमेदवार आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे का याची खात्री करूनच मग एखाद्या पक्षाची उमेदवारी ही जाहीर होत असते.मात्र केज विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार राहिलेल्या मात्र सर्व सामान्य कुटुंबातील पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली आहे.
पृथ्वीराज साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर असलेली निष्ठा पाहून त्यांना उमेदवारी देण्यात आली.त्यांचे विधानसभा मतदार संघात असलेले योगदान,कार्य आणि सर्व सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारे,सर्वांना आपलेसे वाटणारे पृथ्वीराज साठे यांना केज विधानसभा निवडणुकीत जनाधाराबरोबरच आर्थिक मदतीचा ओघ देखील सुरू आहे.अंबाजोगाई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचार सभेत केज तालुक्यातील मौजे लहुरी ग्रामस्थांच्या वतीने पृथ्वीराज साठे यांना लोकवर्गणीतून 75,000 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.त्या आधीही साठे यांना विविध आर्थिक मदत देण्यात आली आहे.
यावेळी आ.रोहित पवार, खा.बजरंग सोनवणे,उमेदवार पृथ्वीराज साठे,राजकिशोर मोदी,मा. आ.संगीता ठोंबरे,सुरेश तात्या पाटील,विनोद चाटे,राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवकचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक यांच्यासह विविध पदाधिकारी ,नेते उपस्थित होते.