भव्य पदयात्रा व मोटार सायकल रॅलीचे आयोजन

केज :- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार अंतिम टप्यात आला असून प्रचाराने वेग पकडला आहे.उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य सभा,पदयात्रा,मोटार सायकल रॅली,कॉर्नर बैठकांना वेग आला आहे.
त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 18 रोजी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा व मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या पदयात्रेस व मोटार सायकल रॅलीस महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या भव्य पदयात्रा व मोटार सायकल रॅलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आले आहे.