तिसरा पर्याय आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून रमेश तात्या गालफाडे यांना जनतेतून प्रतिसाद

केज :- केज विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही तिरंगी लढत होत आहे.महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पृथ्वीराज साठे हे निवडणूक लढवत आहे.त्याच बरोबर यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रमेश तात्या गालफाडे यांच्या रूपाने तिसरा पर्याय आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांचे उमेदवार हे प्रस्थापित असून आमदार राहिलेले आहेत.दोघांचीही काम करण्याची पद्धती ही जनतेने पहिली असून या वेळी मतदारांना नवीन स्वच्छ चेहऱ्याची गरज होती ती रमेश तात्या गालफाडे यांच्या रूपाने पाहायला मिळते आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराचा झंजावात गावोगावी पाहायला मिळत आहे.जनतेतून त्यांना तिसरा पर्याय आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे.
रमेश तात्या गालफाडे हे केज विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनास प्रचारादरम्यान मोठा प्रतिसादही मिळताना दिसतो आहे.