विकासाच्या मुद्यांवर नमिता मुंदडा यांचे पारडे जड

केज :- प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघाचा विकास व्हावा आणि आमदार म्हणून प्रत्येक गाव तांड्याला त्याचा लाभ मिळावा हा ध्यास मनी घेऊ काम करत असताना मतदार संघातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आ.मुंदडा यांच्या माध्यमातून विविध गावात विकास कामे करण्यात आले.आणि हाच मुद्दा या विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरत आहे.
विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे.विरोधी उमेदवार प्रचाराचे मुद्दे शोधत असताना आ.नमिता मुंदडा या मात्र विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढवत असल्याचे प्रचारादरम्यान सांगत आहेत. आ.मुंदडा यांनी रस्ते विकासाची गंगा मतदार संघात आणली आहे.रस्ते विकासाबरोबरच देवस्थानचा विकास,गाव अंतर्गत रस्ते,लाईटच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन ट्रान्सफार्मरची उभारणी करून विजेचा प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे.
ही विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्यांवर असून यामध्ये आ.मुंदडा सरस असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.