राजकीय

आज प्रचाराच्या तोफा सायंकाळी थंडावणार

बीड :- प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रसाराची रंगत वाढत चालली असताना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

उमेदवारांनी जाहीर सभा,कॉर्नर बैठका, गाठीभेटी घेत मतदार संघ पिंजून काढला आहे. उमेदवारांचे नातेवाईकही प्रचारात सक्रिय होते.रविवारी सुट्टी असल्याने अनेक मतदार घरीच असतात. याच संधीचे सोने करत उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी प्रचाराला गती दिली. हा दिवस प्रचारासाठी सुपर संडे राहिला.

दरम्यान, आज सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवस सर्वांसाठीच कसरतीचे ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!