Uncategorized

मांजरा प्रकल्प,धनेगाव,ता. केज येथे वृक्षारोपण

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील मौजे धनेगाव येथील बीड,लातूर उस्मानाबाद सह अनेक गावांची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणाच्या पायथ्याशी मांजरा प्रकल्पाच्या वतीने १०१ आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

मांजरा प्रकल्प धनेगाव येथे धरणाच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणात आरक्षित मोकळी जागा आहे.त्या मोकळ्या जागेत सिंचन शाखा क्रमांक १ धनेगाव, ता. केज च्या वतीने १०१ आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले.पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.या वृक्षारोपनाच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा असा एक चांगला संदेश आले.पाटबंधारे विभागाने दिला आहे. पुढील काही दिवसात बांबू ,जांब, जांभूळ इत्यादी वृक्षांची लागवड धरण परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली आहे.

यावेळी मांजरा प्रकल्पाचे शाखा अभियंता सूरज निकम,श्री.ठोंबरे,श्री पोटभरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!