Uncategorized

मौजे लाडेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उत्साहात जयंती

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील मौजे लाडेगाव येथे जगविख्यात साहित्यिक ,अल्पशिक्षित असूनही साता समुद्रापलीकडे ज्यांनी साहित्यिक म्हणून ख्याती मिळवली असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच अंकुशराव अंबाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटोळे यांनी आपण समाजाचे काहीतरी देणं लागतोत या उद्देशाने जयंती उपक्रम म्हणून रमेश तात्या गालफाडे ,प्रदेशाध्यक्ष,बहुजन रयत परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.प्रा. शाळा लाडेगाव येथे शाळेतील मुलांना शालेय साहित्य,स्टीफन डब्बा व खाऊ वाटप करण्यात आला.जयंतीच्या निमित्ताने व्याख्याते योगेश्वर आंबड यांनी मुलांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी जयंती संयोजन समितीचे प्रकाश पाटोळे,रमेश पाटोळे,बाळु पाटोळे, दिपक पाटोळे,सुहास पाटोळे,शिवम पाटोळे सुनील पाटोळे,सुनील पाटोळे,शाळेचे मुख्याध्यापक, ग्रा. प.सदस्य अर्जुन पाटोळे यांच्यासह शिक्षक,गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!