Uncategorized
मौजे उंदरी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे उंदरी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या नावाचा पोवाडा साता समुद्राच्या पलीकडे घेऊन जाणारे जगविख्यात साहित्यिक,लेखक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य नाव असणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या प्रमाणात राज्यभर साजरी होत आहे.मौजे उंदरी येथील समाज बांधवांच्या,नागरिकांच्या,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी छावा जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे, उत्तम ठोंबरे गुरुजी, हरिभाऊ ठोंबरे, संजय लोखंडे,संतोष लोखंडे,विनोद कसबे सचिन लोखंडे आप्पा लोखंडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.