Uncategorized

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये युवा विद्यार्थ्यांची तुफान शाब्दिक फटकेबाजी…

(पिंपरी चिंचवड) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मनविसे पिंपरी चिंचवडच्या वतीने “शोध तुमच्यातील वक्त्यांचा” या शीर्षकाखाली आयोजित अभिनव वक्तृत्व स्पर्धेला एकुण ८१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे उदंधाटन गुरु गणेश शाक्ळेचे प्राचार्य मारकड सर तसेच खिंवसरा पाटील विद्या मंदिर चे नटराज जगताप यांच्या हस्ते झाले,त्यानंतर सकाळी ११ ते ४ वक्तृत्व सादरीकरण झाले, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता बक्षिस समारंभ पक्षाचे नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर,मनसे प्रवक्ते व मनविसे सरचिटणीस गजानन काळे,सरचिटणीस रणजित शिरोळे, विद्यार्थी सेना सचिव आशिष साबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले,यांच्या हस्ते झाले, त्यानंतर मनविसेच्या वतीने पिंपरी चिंचवड मधील उत्कृष्ठ वक्त्यांचा हि सन्मान करण्यात आला,यामधे नाना शिवले,दिगंबर ढोकळे,काका गावडे,अक्षय मोरे, राजेश अवसरे, अनिल वडघुले,निलेश मरळ,सुरज भोईर यांचा सन्मान करण्यात आला,
यानंतर वक्तृत्व स्पर्धेचे अंतिम बक्षिस वितरण पार पडले यामध्ये १० ते १७ या वयोगटात प्रथम क्रमांक श्रुती डौले व १७ ते २५ वयोगटात प्रथम क्रमांक शुभम मोटे यांना देण्यात आला तसेच सर्व सहभागी स्पर्धेकांचा ही सन्मान चिंन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे,शहर अध्यक्ष अनिकेत प्रभु,सचिव अक्षय नाळे,उपशहर अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रतिक शिंदे,सिध्देश सोनकवडे,आकाश लांडगे, श्रध्दा देशमुख,निकिता दुसाणे,विभाग अध्यक्ष सुमित कलापुरे,अक्षय खामकर,किरण पाटील,शरण्य पाटणे,शंतनु तेलंग, यश कुदळे, महेश बडगुजर,प्रज्योत पुजारी, हर्षल कोळेकर,रोहीत थरकुडे, यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!