Uncategorized
परळीत गोळीबाराची घटना!

परळी:- तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच असलेल्या एका व्यक्तीचा परळी शहरात गोळ्या घालून खुन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अन्य एक गंभीर जखमी झाल्याचे कळते. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. बँक कॉलनी परिसरात ही थरारक घटना घडली.बापूराव आंधळे असे मयत इसमाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून परळी पोलिस पुढील तपास करित आहेत.