Uncategorized

महात्मा फुलेंचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा—-यशवंत गोसावी

महात्मा फुलेंचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा—-यशवंत गोसावी

( बनसारोळा येथे महात्मा फुले जयंती निमित्त कार्यक्रम)

केज – दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी

महात्मा फुले यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यायला हवा तर समाजात परिवर्तन गतीने होऊ शकेल असे मत व्याख्याते प्रा यशवंत गोसावी यांनी केले ते बनसारोळा येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच भीमराव गोरे माळी, आमदार नमिता मुंदडा सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे उपसभापती ऋषिकेश आडसकर, पंचायत समिती सदस्य तानाजी जोगदंड,स्वीय सहायक खंडू गोरे ,अजय काळे,गोविंद शिनगारे,डॉ हनुमंत सौदागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना ऋषिकेश आडसकर म्हणालेमहात्मा ज्योतिराव फुलेंचे कार्य प्रेरणादायी आहे. आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या मी आमदार होऊ शकले हे श्रेय श्रेय महात्मा फुले यांचे आहे. महात्मा फुले यांचे मोठे कार्य आहे हा इतिहास सर्वांसाठी अमूल्य ठेवा आहे असे मत व्यक्त केले. कल्याण आखाडे महापूरुषांचे विचारमहत्वाचे आहेत. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी महात्मा फुले यांनी आयुष्य वेचले असे मत व्यक्त केलेपुढे बोलतांना गोसावी म्हणालेमाता पित्यांची सेवा हाच जयंतीचा संदेश आहेमाणसं जातीसाठी नाही मातीसाठी जगली पाहिजेत महापुरुषांच्या वाटण्या करून घेऊ नयेत महापुरुषांना समजून घेऊन समतेचा विचार पेरायला हवा असे मत व्यक्त केले . प्रास्ताविक रमेश गोरे यांनी केले, सूत्रसंचालन बनेश्र्वर गोरे, कार्यक्रम यशस्वतेसाठी रोहित काळे,डॉ.अशोक सोनके, आकाश भोसले, इंजी.शिव गोरे,पवनकुमार गोरे,प्रवीण गोरे, इंजी.मनोज गोरे,स्वप्नील गोरे,किशोर गोरे,क्रांतीसुर्य प्रतिष्ठान बनसारोळा टीम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार अजय काळे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!