सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्थाकडून शिवप्रताप दिन व दिपोत्सव लालमहालात साजरा.

पुणे :- दत्तात्रय मुजमुले
10 नोव्हेंबर (शिवप्रतापदिन) रोजी पुणे येतील सुप्रसिद्ध असलेल्या लाल महाल येथे सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था कडून एक हजार दिवे प्रज्वलीत करून शिवप्रतापदिन आणि दिपोउत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवरायांनी याच दिवशी अफजलखान चा कोथळा काढला होता. स्वराज्याचा मधला सगळ्यात मोठा बाधा त्यांनी दूर केली होती. म्हणुन हा शिवप्रतापदिन अवघा महाराष्ट्र साजरा करतो.विविध कार्यक्रम करून या दिवसाची महती जो तो आपल्या स्तरावर प्रसार माध्यमाच्या साह्याने इतरां परेंत पोहचवत असतो. असच या दिवसाचं महत्व सामाजिक शिवकार्य करणाऱ्या मुलांना प्रेरणादायी ठरावे म्हणून सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था कडून लाल महाल येथे मोठ्या उत्साह आणि जोशात कार्यक्रम घेतला.या कार्यक्रम मध्ये वैचारिक शिदोरी देण्यात आली. या दिवसाचं महत्व काय हे सांगण्यात आले. चालू वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा चे 350वे वर्ष असल्याने, ज्यांच्या मुळे देव्हाऱ्यात देव राहिले अशा छत्रपती शिवरायांनाच्या चरणात दिपावली चा पहिला दिवा लागला पाहिजे अशा मुळे,नवीन नवीन मुलांना गडकिल्ले वर दिपोत्सव साजरा करायचा असतो परंतु लाल महाल सारख्या ऐतिहासिक वास्तू मध्ये जिथून स्वराज्य उभ राहिले अशा वास्तू मध्ये सोहळा साजरा व्हावा म्हणुन सह्याद्रीचे भुते कडून एकमत झाले आणि या वर्षी शिवप्रताप दिन आणि दिपावळी सोबत आल्याने हा कार्यक्रम लाल महाल येथे एक हजार दिवे लावुन लाल महालाच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा देण्याचे काम सह्याद्रीचे भुते संस्था कडून करण्यात आले. कार्यक्रम मध्ये सुशोभीत रांगोळी काढून श्रीमान रायगड किल्लेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. 350 दिवे यांनी यांनी नाव साकारले. लाल महाल मधील परिसर हा दिव्यांनी उजळून निघाला.फुलांच्या माळा, दीपावली स्पेशल आकाश कंदील लावुन लाल महाल मध्ये सोहळा पार पडला.
शिवप्रतापदिन सोहळा साजरा करण्यासाठी आणि दीपावली चा पहिला दिवा लावण्या साठी सह्याद्रीचे भुते संस्था कडून स्वराज्यमधील सरदार घराणे मधील शिर्के घराण्याचे वंशज दिपकराजे शिर्के, मालुसरे घराणे चे वंशज सुभेदार श्री. कुणालजी मालुसरे, शिळीमकर घराणेचे वंशज श्री. मंगेश दादा शिळीमकर,मोहीते घराण्याचे वंशज श्री राजेंद्र मोहीते, मरळ घराण्याचे वंशज श्री. प्रदीप मरळ,इंदलकर घराणेचे वंशज श्री समीर इंदलकर, कंक घराण्याचे वंशज श्री. रविंद्र कंक, गाडे घराण्याचे वंशज श्री. अमित गाडे, मोहीते घराण्याचे वंशज श्री संदीप मोहीते, गायकवाड घराणेचे वंशज श्री. शिवदत्त गायकवाड, या सरदार घराणे चे वंशज कार्यक्रम ला उपस्थित होते. सह्याद्रीचे भुते संस्थाच्या मित्र संघटना मधुन संघटनाचे प्रमुख पैकी पै. श्री.भुषण वर्पे (विश्व हिंदू मराठा संघ) ,श्री. दिनेश ढगे (युवा साम्राज्य सेना), श्री. रोहित भोसले (रुबाबदार मराठा) , श्री.ओंकार वाळुंज (शिवमुद्रा फाउंडेशन) ,श्री. सचिन भोसले (छत्रपती शासन) , श्री. वैभव साळुंखे (छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती) , श्री आप्पासाहेब कदम (शंभूराजे प्रतिष्ठान), श्री. संजय गायकवाड ( स्वराज्य ) अशी मान्यवर कार्यक्रम ला उपस्थित होते.
तसेच सह्याद्रीचे भुते संस्था मधुन प्रामुख्याने मिताली ताई गरड, मिताली ताई कदम, सुनीता खंदारे, स्वरा खंदारे, ऋतुजा जाधव,श्रुती चौधरी,राजश्री पाटोळे, पुर्वा काळे, सोनाली पाटोळे,प्रियंका कदम, श्री. प्रथमेश सांगळे, पांडुरंग पौळ,मोहन कदम, वैभव टकले,राहुल सोमासे, बसवेश्वर व इतर आणि श्री. राज दादा तपसे प्रामुख्याने उपस्थितीत होते.