राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड जाहीर

केज :- प्रतिनिधी

आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) केज तालुकाध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा.सुनिल तटकरे व ना. धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार विष्णू चाटे यांची दि.४ फेब्रुवारी रोजी केज तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची विद्यमान स्थिती बिकट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रभर सर्वसामान्यांचे मुद्दे उचलत असतो व सर्व सामान्य, शेतकरी, युवकांना न्याय देण्याचा काम करतो तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक कार्यात व जनसामान्यात ओळखीचे असलेल्या लोकांना पक्षाची जबाबदारी दिली जात आहे.समाजकार्यात पुढे असणारे विष्णू भाऊ चाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट)केज तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

विष्णू भाऊ चाटे यांच्या निवडी बद्दल वाल्मीक आण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, बजरंग बप्पा सोनवणे, व आदींनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!