राजकीय

बीड जिल्ह्याला लागलेला मागासपणाचा कलंक पुसून काढणार — बजरंग बप्पा सोनवणे

बीड / शिरूरकासार :- जिल्ह्यात भाजपला विकासाचे कोणतेही व्हिजन नसून भाजप दिशाहीन झालेला आहे. मागासलेपणाचा जिल्ह्याला लागलेला कलंक मी पुसून टाकणार असा ठाम विश्वास बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शिरूर कासार येथे व्यक्त केला

   शिरूर कासार येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ गित्ते, माजी मंत्री बदमराव आबा पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी बजरंग बप्पा सोनवणे हे येथील पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना म्हणाले की, भाजपने त्यांच्या स्वार्थासाठी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बदनाम केले आहे. विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्याने जिल्ह्यात भाजप आणि त्यांचे उमेदवार आता दिशाहीन झाले आहेत. भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कापणे हे अत्यंत दुर्दैवी आहे भाजपाच्या उमेदवार म्हणतात त्यांचे तिकीट केंद्रीय कमिटीने दिलेले आहे मग त्यांना केंद्रातील नेते निवडून आणणार का असा प्रश्न पडतो  कारण राज्यातल्या नेत्यांशी त्यांचे संबंध सर्वश्रुत आहेत असे सांगत त्यांच्या पक्षांतर्गत विरोधावरून  टोलाही  लगावला 
 पुढे बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले की ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्याचा आरोप हा जाणीवपूर्वक करून जिल्ह्याला बदनाम करण्याचे षडयंत्र या भाजपाने केलेले आहे. मी निवडणु आल्या नंतर विविध विकासाचे प्रकल्प आणून जिल्ह्याला लागलेला मागासपणाचा कलंक पुसून टाकीन. विद्यमान खासदाराचे तिकीट नाकारून उमेदवार बदलणे हाच भाजपचा खरा पराभव असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला  
    यावेळी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, नगरसेवक बालासाहेब जाधव, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबुराव झिरपे, बी जी मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष जरांगे, नगरसेवक अमोल चव्हाण, सावता कातखडे, भीमराव गायकवाड, नासिरभाई शेख, खदिरभाई शेख, दीपक खोले, सय्यद पठाण, अमजद शेख, सागर गाडेकर, असलम शेख, गणेश मोरे, शिवभूषण जाधव गोकुळ पवार, विनोद पवार भाऊसाहेब डांबे, प्रशांत आगलावे हे उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!