राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजीक न्याय विभाग केज तालुका अध्यक्ष पदी अजय भांगे यांची निवड*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजीक न्याय विभाग केज तालुका अध्यक्ष पदी अजय भांगे यांची निवड*

केज :- दत्तात्रय मुजमुले

सामाजिक व न्याय विशेष सहाय्य मंत्री मा धनंजय मुंडे यांच्या आदेशाने व माजी आमदार पृथ्वीराज साठे ,जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अजयजी भांगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग केज तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

केज तालुक्यात पाठीमागील सात वर्षापासुन अजय भांगे हे अविरत पणे सामाजीक राजकीय कार्य वाडी वस्ती तांड्यावर जावुन करत आहेत विविध प्रश्न त्यांनी हाताळले आहेत यांचीच दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सामाजीक न्याय विभाग केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे नियुक्ती पत्र देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग बीड जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.विनोदजी जगतकर यांच्या हस्ते परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात देण्यात आले, या प्रसंगी नाथ प्रतिष्ठान चे सहसचिव अनंतजी इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते उज्जैनजी बनसोडे, महेश ( गुड्डू ) जोगदंड व इतर मान्यवर उपस्थित होते . तरी आपण पक्षाची ध्येय धोरणे व पद्मविभुषन मा खा. शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वसामान्या पर्यंत पोहचविणार असल्याचे मत अजय भांगे यानी व्यक्त केले,त्यांच्या या निवडीने सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!