लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वारीप, युथ रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न!

केज :- प्रतिनिधी
केज येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , युथ रिपब्लिकन पक्षाची बैठक युवा नेते योगेश भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते अनिकेत भाई संसारे यांच्या आदेशाने बीड जिल्ह्याचे युवा नेते योगेश भाई गायकवाड यांची बीड लोकसभा निवडणूक संदर्भात 9 मे रोजी बैठक संपन्न घेतली.त्या बैठकी मध्ये होणाऱ्या आगामी बीड लोकसभा निवडणुकी बाबद चर्चा झाली असून पक्षाने महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे.तरी बीडच्या महाविकास आघाडीला आंबेडकरी चळवळीतील पक्षांचा विसर पडला आहे असा एकच सुर सर्व कार्यकर्त्यांच्या तोंडी आला आहे.
बीडच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर स्वारीप, युथ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्यास होणाऱ्या निवडणुकीचे परिणाम वेगळेच होतील अशी शंका आंबेडकरी चळवळीतल युवा नेते योगेश भाई गायकवाड यांनी व्यक्त केली .