Uncategorized
आरक्षणासंदर्भात धक्कादायक बातमी

केज :- धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी केज तालुक्यातील केकत सारणी येथील युवक अजय वैजनाथ शिंदे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे आयसीयु कक्षात उपचार चालु आहेत.
मागील महिण्यातच केकत सारणी येथील युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलन करुन आत्मदहनाचा ईशारा दिलेला होता.उप विभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर ते आंदोलन मागे घेतले होते.दरम्यान सदरील युवक सध्या मृत्युशी झुंज देत आहे.