राजकीय

तुषार कामठे यांचा अजित पवार गटाला ‘विशाल’ धक्का..!

पिंपरी : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधील तसेच महायुतीतील अनेक नगरसेवक पदाधिकारी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याची माहीती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी याआधीही माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली होती, नुकतीच अजित पवार गटातील 14 नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तुषार कामठे यांच्या माध्यमातून शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळीच अजित पवार गटात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच आज अजितदादा गटातील दोन युवा पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी त प्रवेश केला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी युवक अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर व पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रवक्ते रविकांत वर्पे तसेच शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!