राजकीय

केज विधानसभा मतदार संघात उमेदवारांची स्थिती म्हणजे कोणता झेंडा घेऊ हाती!

केज :- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन अनेक इच्छुक उमेदवार आमदार होण्याच्या इच्छेने कामाला लागले होते.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालल्याने व शरद पवार जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून येऊ शकतो हे समीकरण तयार झाल्याने अनेकांचा ओढा महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे वाढला आहे.मात्र इथे इच्छुक अनेक असल्याने सावध पवित्रा घेत इतरही पक्षांची चाचपणी करत भेटी वाढवत असल्याचे चित्र आहे.
केज विधानसभा मतदार संघातही उमेदवारांची स्थिती म्हणजे कोणता झेंडा घेऊ हाती अशी झाली आहे.भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.तसेच महायुती कडून लढण्यास इतर कोणी इच्छुकही नाही.मात्र केज विधानसभा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली आहे.आणि त्यांच्या पक्षाकडून डझनभर इच्छुक उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावत आहेत.मात्र इथे अनेक वर्षापासून माजी आमदार पृथ्वीराज साठे हे सक्रिय राजकारणात आणि शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून काम करतात म्हणून त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे.तसे असेल तरी हे राजकारण आहे असे समजून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलाच उमेदवारी मिळणार म्हणून डझनभर इच्छुक प्रचारालाही लागले आहेत.
एकीकडे मलाच शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी मिळणार म्हणून अनेक इच्छुक उमेदवार प्रचारालाही लागले आहेत.इच्छुक जास्त आणि काही निष्टांवंतामुळे उमेदवारी मिळण्यास अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरून अनेक इच्छुक इतर पक्षाकडून अंतर्गत चाचपणी करत आहेत.मात्र अशाने इधर न उधर अन …अशी अस्वस्था होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!