राजकीय

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदी राहुल सोनवणे

केज दि.२७ (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्ष पदी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीे चे उपाध्यक्ष नाना गवांडे दिले.

मागच्या दोन दिवसापूर्वीच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे आपला राजीनामा दिला होता त्या अनुषंगाने दि.२७ रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्ष पदावर उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल सोनवणे हे विद्यार्थी दशेपासून काँग्रेस मद्ये काम करत आहेत एन एस यु आय चे प्रदेश सरचिटणीस या सह जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदावर देखील त्यांनी काम पाहिले आहे. उच्च शिक्षित, संयमी व सुस्कृत राजकारणी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसच्या नेत्या खा.सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!