Uncategorized
वीज पडून म्हैस दगावली

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे नायगांव येथील शिवारातील गोठ्यासमोर बांधलेली म्हैस वीज पडून दगावली असल्याची घटना घडली आहे.
शुक्रवार दिं.29 रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मौजे नायगांव येथील उत्रेश्वर चंदबस गुजर यांची गोठ्यासमोर बांधलेली चार महिन्यांची गाभण असणारी म्हैस संध्याकाळच्या सुमारास वीज पडून दगावली आहे.